उडणार्‍या लामांच्या प्रदेशात... हिमालयातील ऑफबिट भटकंतीवर आधारित या पुस्तकाचं प्रकाशन स्वप्नील जोशी यांच्या हस्ते झालं. पुस्तकाच्या अनुवादिका प्रा. रेखा दिवेकर व फिटनेस गुरु ऋजुता दिवेकर या कार्यक्रमास उपस्थित होत्या. नुवाद ऋजुताच्या आई, प्रा. रेखा दिवेकर यांनी केला आहे.

लोकनेता... गोपीनाथ मुंडे मा. लालकृष्ण अडवानींच्या हस्ते लोकनेता या मा. गोपीनाथ मुंडे यांच्या फोटोबायोग्राफीच्या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन झाले.

‘व्हाय नॉट आय’ या वृन्दा भार्गवे यांच्या पुस्तकाचं प्रकाशन भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनातील एका शानदार कार्यक्रमात झालं.

संसदेच्या सभागृहात मा. पंतप्रधान नरसिंहराव यांच्या हस्ते आदरणीय कै. यशवंतराव चव्हाण यांच्या संसदेतील भाषणांचा संग्रह Y. B. Chavan in Parliament (4 Volumes) प्रकाशन झाले.