गोदरेज उद्योगसमूहाचे चेअरमन सोहराब गोदरेज यांच्या ‘निरंतर ध्यास’ या आत्मचरित्राचे प्रकाशन करताना डॉ. शां. ब. मुजुमदा. जमशेद गोदरेज, बी. के. करंजिया यांच्या समवेत उल्हास लाटकर.

लोकनेते कै. भाऊसाहेब थोरात यांनी लोकचळवळीच्या माध्यमातून सुरु केलेल्या दंडकारण्य मोहिमेची कथा पुस्तकरुपात अमेयने शब्दबध केली. या पुस्तकाचे प्रकाशन तत्कालिन राष्ट्रपती मा. प्रतिभाताई पाटील यांनी केले. या प्रसंगी मा. बाळासाहेब थोरात, सत्यजित तांबे, अमेय लाटकर. या पुस्तकाची संयुक्‍त राष्ट्रसंघानेही दखल घेतली आहे.

सहकाराच्या माध्यमातून संगमनेर तालुक्याचा चेहरामोहरा बदललेल्या स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात यांच्या ‘अमृतमंथन’ या आत्मचरित्राच्या प्रकाशनाच्यावेळी आपले मनोगत व्यक्‍त करताना भाऊसाहेब थोरात. डॉ. य. दि. फडके यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले.

ऋजुता दिवेकर यांच्या विमेन ऍण्ड द वेटलॉस तमाशा या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन करीना कपूर यांच्या हस्ते झालं. पुस्तकाचा अनुवाद ऋजुताच्या आई, प्रा. रेखा दिवेकर यांनी केला आहे.