STAY हंग्री STAY फूलिश

  • स्वत: शोधलेल्या रस्त्यानं जाण्याचं ठरवणाऱ्या आयआयएम अहमदाबादच्या 25 पदवीधरांच्या स्फूर्तिदायक कथा!
  • उद्योजकता हाच आपल्या जीवनाचा 'निवडलेला मार्ग' आहे, हे जाणून घेऊन एमबीएनंतर लगेच किंवा एखाददुसरं वर्ष नोकरी करून व्यवसायात उडी मारलेल्या आणि भव्यदिव्य घडवून आणेपर्यंत प्रयत्न करत राहिलेल्या उद्योजकांच्या कथा!

लेखिका: रश्मी बन्सल
अनुवाद: विदुला टोकेकर

"STAY हंग्री STAY फूलिश' ही गोष्ट आयआयएम अहमदाबादच्या 25 पदवीधारकांची आहे. त्यांनी उद्योजकतेचा खडबडीत, खडतर मार्ग निवडला. प्रत्येकाचं वय, त्यांचे दृष्टीकोन, त्यांनी ज्यात ठसा उमटवला ती क्षेत्रं, यांच्यामध्ये फरक आहे. पण त्यांच्यात एक गोष्ट मात्र समान आहे. आपल्या स्वप्नांवर, शक्तीवर त्यांचा विश्र्वास होता. तरुण पदवीधरांना केवळ नोकऱ्या आणि पगार यांच्यापलीकडे पाहण्याची, आपल्या स्वप्नांवर विश्र्वास ठेवण्याची प्रेरणा हे उद्योजक देतात.
प्रत्येक उद्योजकाची गोष्ट वेगळी आहे, पण एका विशिष्ट पातळीवर ती एकच गोष्ट आहे. या उद्योजकांनी विश्र्वासाच्या बळावर उडी घेतली. अनेक वर्षं ते झगडले, धडपडले आणि मग त्यांच्या व्यवसायाचा आकार, व्यवसायाची व्याप्ती वाढवण्याचा मार्ग यांना गवसला, ज्याला आपण 'यश' म्हणतो.

ISBN NO. : 978-81-907294-7-5
प्रकाशन दिनांक : 2008
पाने : 440
किंमत : ` 150