एक्झाम वॉरियर्स

भारताचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी लिखित ‘एक्झाम वॉरियर्स’ हे युवावर्गाला प्रेरणा देणारं पुस्तक आहे. साध्या, सोप्या आणि संवादी भाषेत लिहिलेल्या या पुस्तकात तणावमुक्त परीक्षा देण्यासाठीचे 25 मंत्र दिलेले आहेत.
प्रत्येक मंत्रानंतर अनेक मजेदार उपक्रम दिले आहेत, ते पुस्तकामध्ये किंवा नरेंद्र मोदी अॅपच्या ‘एक्झाम वॉरियर्स मॉड्युल’द्वारे करता येतील.
विद्यार्थ्यांची एकाग्रता, स्मरणशक्ती आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी उपयुक्त अशी आसने व प्राणायाम क्रिया पुस्तकात दिलेल्या आहेत.
हे पुस्तक विद्यार्थ्यांना परीक्षेत यशस्वी होण्याबरोबरच जीवनात यशस्वी होण्यासाठीही उपयुक्त ठरेल.

लेखक: पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी

मा. श्री. नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताचे पंतप्रधान आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पक्षाला 2014 च्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये ऐतिहासिक पूर्ण बहुमत मिळाले. असे बहुमत भारताच्या राजकारणात गेल्या 30 वर्षांत कोणत्याही पक्षाला प्राप्त झाले नव्हते. त्यांच्या या ऐतिहासिक विजयात भारतीय युवा व विशेषत: पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणारे युवामित्र यांचा भक्कम वाटा होता.
आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रांतील परिवर्तन घडवून आणण्यासाठीच्या सुधारणा पंतप्रधानांनी केंद्रस्थानी ठेवल्याने भारताच्या विकासयात्रेचा वेग आणि त्याची व्याप्ती या दोन्हीलाही मोठी चालना मिळाली आहे.
शिक्षण हा प्रांत त्यांच्या विशेष आस्थेचा आहे. युवावर्गासाठी ते स्फूर्तिदायी अन् प्रेरक नेते आहेत. नभोवाणीवरुन दरमहा प्रसारित होणारा त्यांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम समाजाच्या सर्व स्तरांमधे विलक्षण लोकप्रिय आहे. पहिल्यांदा 2015 साली आणि त्यानंतर 2016 व 2017 साली त्यांनी या कार्यक्रमातून ‘एक्झाम वॉरियर्स’ना संबोधित केले. 
यापूर्वी, 2001 ते 2014 या कालावधीत श्री. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस (संघटन) म्हणून, तसेच पक्षातील अनेक महत्त्वपूर्ण संघटनात्मक जबाबदार्‍यांची धुरा त्यांनी पेलली आहे. 
वाचन, लेखन आणि लोकांशी संवाद यात ते मनापासून रमतात. सोशल मिडीयाचा ते नियमितपणे वापर करतात व या माध्यमांत सर्वात जास्त पाठिंबा असलेल्या नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. जगभरातील लोकांशी ‘नरेंद्र मोदी मोबाईलअॅप’ द्वारेसुद्धा ते जोडले गेलेले आहेत. 
Buy this book on  Amazon

ISBN NO. : ISBN: 978-93-5080-066-9
किंमत : ` 100