कहाणी बचतगटांची

स्त्रियांचे बचतगट ही मूलभूत संकल्पना आणि त्याचा विकास ह्या आगळ्या-वेगळ्या विषयावरील पुस्तक. बचतगटांच्या संकल्पनेची बीजे रोवली गेल्यापासून ते आजतागायतच्या त्या संकल्पनेच्या स्थित्यंतराच्या इतिहासाची माहिती अतिशय साध्या परंतु रंजक स्वरूपात! महाराष्ट्रातील बचतगटांच्या चळवळीची चित्तवेधक वाटचाल!

लेखिका: स्वाती महाळंक

‘बचतगट’ या संकल्पनेने चळवळीचे व्यापक रूप धारण केले आणि त्यातून असंख्य महिलांचे भावविश्व व्यापक होत गेले. घराचा उंबरठाही न ओलांडलेल्या महिलांना नव्या जगाची ओळख झाली, आणि या जगात आपलं अस्तित्व शोधण्यासाठी त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. काडी-काडी जमवून संसाराच्या फाटलेल्या आभाळाला ठिगळं लावीत ते पेलण्यासाठी झटणाऱ्या बिनचेहऱ्याच्या असंख्य बायकांना या संकल्पनेनं स्वतःचा असा एक चेहरा दिला. पैसा तर त्यातल्या काहीजणी आधीही कमवीत होत्या... काबाड-कष्ट करून... धुणीभांडी, शेतात मोलमजुरी करून... त्याशिवाय पर्यायच नव्हता! पण बचतगटानं अशा अनेक जणींना पैशाबरोबर प्रतिष्ठाही दिली. स्वाभिमानी जगणं दिलं! पण या चळवळीचा आणखीही एक मोठा परिणाम आहे. गरीबातली गरीब व्यक्ती बँकेशी जोडली जाते आहे. बचतगटांनी बँकांच्या अर्थकारणाला उभारी दिली आहे. ग्रामीण भारत बदलतो आहे! परिवर्तनाच्या या प्रक्रियेचा घेतलेला सुरस वेध!

ISBN NO. : 978-93-5080-057-7
प्रकाशन दिनांक : 30 जुलै 2015
पाने : 224
आवृत्ती : प्रथम आवृत्ती
किंमत : ` 255