भावयात्रा

  • भारताचेपंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांचा मराठीतला पहिलाच कविता संग्रह
  • मा. श्री. नरेंद्र मोदीयांचं व्यक्तिमत्त्व जाणून घेण्याची, त्यांची संस्कार व विचारधारा समजून घेण्याचीइच्छा असणाऱ्या प्रत्येकाने वाचलेच पाहिजे, असे पुस्तक
  • चांगल्या व सक्षम समाजनिर्मितीची प्रेरणा देणारे काव्यमय चिंतन.

लेखक: पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी
अनुवाद: विलास कुलकर्णी

नरेंद्र मोदी हे नाव राजकीय क्षेत्राशी घट्ट जुळलेलं आहे. गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी तब्बल तीन वेळा सांभाळणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी विकासाभिमुख आणि सामान्य जनतेच्या हिताच्या प्रशासनाची एक नवीन दिशा स्वतःच्या नेतृत्वातून दाखवली. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिशय प्रखर विचारांमुळे सतत चर्चेत असणारे हे नेते! राजकीय क्षेत्रात धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे प्रसिद्ध असणाऱ्या मा. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या कणखर व्यक्तिमत्त्वाची एक संवेदनशील बाजूही आहे. गुणग्राहक, चतुरस्र वाचक व प्रभावी वक्ता असणारे श्री. नरेंद्र मोदी उत्तम लेखक व कवी आहेत. ‘भावयात्रा’ या कवितासंग्रहाद्वाराश्री. नरेंद्र मोदी यांच्यातील संवेदनशील मनाच्या कवीचं दर्शन वाचकांना होतं. राजकीय क्षेत्रात कार्यरत होण्यापूर्वी अनेक वर्षं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून नरेंद्र मोदींनी मोठं कार्य केलं आहे. त्यांनी भरपूर प्रवास केलाय. उत्तम तेघेण्याची सौंदर्यदृष्टी त्यांच्यात आहे. चांगल्या गोष्टींना दाद देण्याची गुणग्राहक वृत्तीदेखील त्यांच्यापाशी आहे. या साऱ्याचे प्रतिबिंब ‘भावयात्रा' या कविता संग्रहात दिसून येते.

ISBN NO. : 978-93-5080-040-9
प्रकाशन दिनांक : 30 जुलै 2013
पाने : 112
आवृत्ती : प्रथम आवृत्ती
किंमत : ` 250