विकासाचं राजकारण

समृद्ध, सुरक्षित महाराष्ट्राच्या निर्मितीचं स्वप्न!
"जिथं विकासाचा मुद्दा येतो, तिथं राजकारण आडवं येता कामा नये. राजकारण करताना राज्याच्या विकासाला खीळ बसणार नाही याची काळजी राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकालाच घ्यावी लागणार आहे,' ही जाणीव निर्माण करणारं पुस्तक!

लेखक: नितीन गडकरी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी राष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी 'समन्वयाच्या राजकारणाची' नवी संकल्पना रुजवली आहे. या संकल्पनेला मिळत असलेली लोकमान्यता लक्षात घेतली, तर नजीकच्या भविष्यात ती जगभर रूढ होईल. याच धर्तीवर नितीन गडकरी यांनी 'विकासाचं राजकारण' ही संकल्पना महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सामाजिक जीवनात रुजवण्याचा प्रयत्न चालवला आहे. विरोधासाठी विरोध त्यांना मान्य नाही. वेळप्रसंगी, राजकीय मतभेद बाजूला सारायचे आणि विकासाच्या मुद्दयावर एकजूट दाखवायची, आणि त्यातून राज्याच्या प्रगतीला हातभार लावायचा, असा त्यांचा दृष्टीकोन. याच पार्श्र्वभूमीवर शसमृद्ध आणि सुरक्षित' महाराष्ट्राच्या निर्मितीसंदर्भात त्यांनी केलेलं हे विचारमंथन...

प्रकाशन दिनांक : 2 ऑक्टोबर 2009
पाने : 84
आवृत्ती : प्रथमावृत्ती
किंमत : ` 99