गिव्हिंग

सामान्य व्यक्तींच्या असामान्य कर्तृत्वगाथा! जग बदलण्याचा विश्र्वास मनात रुजवणारे पुस्तक!

लेखक: बिल क्लिंटन
अनुवाद: अभिजित थिटे

वेळ, कौशल्ये किंवा पैशांचे दान करून मानसिक समाधान आणि आनंद मिळवणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांविषयी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी या पुस्तकात लिहिले आहे. समाजासाठी दान करण्याचे विविध मार्ग आहेत. त्यांचा अवलंब केला तर समाजात निश्र्चितपणे बदल घडून येतो. सर्वसामान्य नागरिक स्वत:च्या बळावर काय काय करू शकतात, त्यासाठी काय केले पाहिजे, दान करणे आवश्यक का आहे, ते किती महत्त्वाचे आहे या गोष्टींचे विश्लेषण या पुस्तकात करण्यात आले आहे. या पुस्तकातील विविध उदाहरणे, व्यक्ती, घटना आपल्या हृदयाला स्पर्श करतील, प्रोत्साहनही देतील. हे जग बदलण्यासाठी सामान्य नागरिकांचा पुढाकार आणि काम किती महत्त्वाचे आहे, हे या पुस्तकावरून स्पष्ट होते.

ISBN NO. : 9788190729444
प्रकाशन दिनांक : 12 मे 2009
पाने : 256
आवृत्ती : प्रथम आवृत्ती
किंमत : ` 295