माही

  • भारताच्या सर्वाधिक यशस्वी क्रिकेट कर्णधाराची जीवन कहाणी!
  • धोनीच्या आयुष्यातल्या क्रिकेट संदर्भातल्या आणि इतरही अनेक सुंदर क्षणांचे खिळवून ठेवणाऱ्या शैलीतील शब्दचित्र!
  • स्वतःच्या आगळ्या-वेगळ्या आणि तरीही अचूक पद्धतीच्या खेळातून माहीने- ह्या भारतीय क्रिकेट कर्णधारानं त्याच्या अगदी कठोर टीकाकारांनासुद्धा कसं प्रभावित केलंय, ह्याचा मार्मिक पद्धतीने घेतलेला वेध!

लेखक: शंतनु गुहा रे
अनुवाद: संध्या रानडे

क्रिकेट विश्वात पाऊल टाकताना धोनीनं तो खेळात असलेल्या त्याच्या आवडत्या फुटबॉलच्या निरोप कसा घेतला, फुटबॉल सोडल्यामुळे, शिवाय क्रिकेट विश्वातलं त्याचं नेमकं स्थान याबद्दलची अनिश्चितता तसेच त्याला त्याची क्रिकेटची पहिली किट कशी मिळाली, हे ह्या पुस्तकातून वाचकांना जाणून घेता येतं. ह्या क्षेत्रातलं त्याचं करियर घडत असताना त्याला किती प्रकारच्या अडचणींशी संघर्ष करावा लागलाय, हे ह्या पुस्तकातून बरंच सविस्तरपणे आलंय.
धोनीची यशानं हुरळून न जाण्याची वृत्ती, त्याचं बाईक्सबद्दलचं प्रेम, त्याची सतत बदलत रहाणारी हेअर स्टाईल, त्याची आणि साक्षीची प्रेमकहाणी ह्या सगळ्यांची रोचक माहिती!

ISBN NO. : 978-93-5080-063-8
प्रकाशन दिनांक : 22 मार्च 2015
पाने : 296 + 8 (फोटो पाने)
आवृत्ती : प्रथम आवृत्ती
किंमत : ` 295