फॅशन गाईड

फॅशनेबल आणि स्टायलिश राहण्यासाठी संग्राह्य गाईड.

लेखिका: करीना कपूर
अनुवाद: करीना कपूर

बॉलिवुडमधली ‘मोस्ट स्टायलिश आणि फॅशनिस्टा अभिनेत्री करीना कपूर हिने सांगितलेल्या फॅशनेबल आणि स्टायलिश बनण्याच्या टिप्स! हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वांत स्टायलिश अभिनेत्री, फॅशनचा नवा ट्रेंड आणणारी अभिनेत्री, दर्जेदार अभिनयाची आयकॉन, बॉलिवुडच्या प्रथम क्रमांकाच्या कपूर कुटुंबातली कन्या असे करीनाच्या वाटचालीतले अनेक पैलू उलगडणारे हे पुस्तक केवळ सुंदर दिसण्यापलीकडे आत्मविश्र्वास आणि बॅलन्स व्यक्तिमत्त्वासाठी मार्गदर्शन करतं. वेगवेगळे ब्रॅण्डस, कुठून काय खरेदी कराल, कुणाला कोणत्या गोष्टी, फॅशन्स, स्टाइल्स चांगल्या दिसतील, याविषयी मार्गदर्शन हे पुस्तक करतंच, तसंच मेकअप, हेअरस्टाईल, डाएट, व्यायाम याविषयीही सांगोपांग माहिती देतं.

ISBN NO. : 9789350800546
प्रकाशन दिनांक : फेब्रुवारी 2014
पाने : 280
आवृत्ती : प्रथमावृत्ती
किंमत : ` 395